
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि ग्रंथ तुमच्या दारी, मुंबई यांच्या वतीने बोरिवली पूर्व येथील राजेंद्रनगर येथे नवीन वाचन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाची जोमाने वाटचाल सुरू असून मुंबईत 150 ग्रंथपेटी केंद्रे असून 10 हजार वाचक या उपक्रमाला जोडले गेले आहेत. या ग्रंथपेटी वाचनालयाच्या सुवर्णसंधीचा येथील रहिवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले आहे. संपर्क – घनश्याम वेटके-9819118365.

























































