
बोरिवलीतील मुंबई अग्निशमन दलाच्या कमांड सेंटरमधील अधिकारी-कर्मचाऱयांना लवकरच वसाहतीत अद्ययावत सुविधा मिळणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून कार्यालय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असल्यामुळे या सुविधा मिळणार आहेत.
अग्निशमन दलाने भायखळा येथील मुख्य पेंद्रासह उपनगरात उपपेंद्र उभारण्यास सुरवात केली आहे. यामध्ये मुख्यालयातील यंत्रणेप्रमाणेच यंत्रणा बंब, शिडय़ा तसेच इतर उपकरणे तैनात ठेवण्यात येतात. यामध्ये बोरिवली येथे अशाच प्रकारचे उपकेंद्र गेल्या वर्षी तयार करण्यात आले आहे.
जुलै 2019 पासून याचा वापर सुरू झाला आहे. या संकुलातील कार्यालयाची इमारत, अधिकारी वसाहत, कर्मचारी वसाहत पंपरूम, डिझेल रूम, ड्रील टॉवर यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 88 लाख रुपये पालिका खर्च करणार आहे.
26 टक्के कमी दराने काम
बोरिवलीच्या अग्निशमन उपकेंद्राच्या सुविधांसाठी कंत्राटदाराकडून 26 टक्के कमी दराने काम करण्यात येणार आहे. पालिकेने या कामासाठी 2 कोटी 42 लाख 31 हजार 795 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र आर. एस. एंटरप्राईझेस या कंत्राटदाराने हे काम 1 कोटी 81 लाख 44 हजार 365 रुपयांत करण्याची तयारी दाखवली आहे. करांसह पालिकेने 1 कोटी 88 लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे.






















































