
बँकेचे अॅप हॅक करून एका पोलीस हवालदाराची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अरुण राणा आणि भोला राणा अशी त्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार हे बोरिवली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात त्यांना मोबाईलवर दोन मेसेज आले. खात्यातून 76 हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानी बँकेचे अॅप्स उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अॅप्स उघडले नाही. तसेच त्यांचा मोबाईलदेखील हॅक झाला होता. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली.