मारहाण करून भरदिवसा दोघांना लुटले, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला जाण्यासाठी स्वारगेट परिसरात ट्रॅव्हलची वाट पाहणाऱ्या तरुणाला मारहाण करून चोरट्यांनी तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघाजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. जावेद रहेमान खान (34) आणि अरबाज आफजल पठाण (23, दोघेही रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंकज लक्ष्मण कसबे (26, रा. दत्तवाडी) यांनी तक्रार दिली आहे.

पंकज आणि त्यांची होणारी बायको मुंबईला जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्वारगेट परिसरातील एका हॉटेलजवळ ट्रॅव्हलची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी तरुणीला ओळखत असल्याचे म्हणत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकज यांनी संबंधितांकडे विचारपूस केली असता, त्यांनी पंकजला मारहाण केली. त्यानंतर तरुणीकडील 15 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत.