
बाळ बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नसल्याचे म्हणणे जामीन अर्जावरील सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी मांडले. बोठेच्या जामीन अर्जावरील शुक्रवारी सुनावणी झाली. रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. बोठेच्या जामीन अर्जावर याआधी सरकार पक्षाने म्हणणे मांडले आहे.
बोठेच्या वकिलांनी शुक्रवारी दुपारी म्हणणे मांडले. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, तसेच पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठे याला आरोपी म्हणून घोषित केले आहे. इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस घाईघाईने कोर्टात आरोपीला फरार घोषित करण्याची प्रक्रिया राबवत नाहीत. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी खूप घाईघाईने फरार घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणणे बोठेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले.
























































