बॉक्स ऑफिस कलेक्शनने केले नाराज; गंगुबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’पर्यंत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील तीन महिन्यांत अनेक हिंदी चित्रपट  प्रदर्शित झाले. यातील काही हिट तर काही फ्लॉप ठरले. काही चित्रपट तर मोठे कलाकार असूनही तिकीट बारीवर काही खास कामगिरी करू शकले नाहीत. काहींचे  कलेक्शन बजेटपेक्षा खूपच कमी असल्याने त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.

बधाई दो!

अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा ‘बधाई दो’ चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 28.33 कोटींची कमाई केली.

गंगुबाई काठियावाडी

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे बजेट 100 ते 160 कोटींच्या दरम्यान आहे. मात्र चित्रपटाने अपेक्षेनुसार कलेक्शन केलेले नाही. आतापर्यंत सुमारे 92 कोटींची कमाई केली आहे. तज्ञांच्या मते, चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुमारे 186 कोटींची कमाई करेल.

झुंड

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे बजेट 22 कोटी होते. आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त 13.51 कोटींच्या आसपास झालेले आहे.

बच्चन पांडे

18 मार्च रोजी अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट जवळपास 165 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, पण त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 38.25 कोटींची कमाई केली आहे.

राधेश्याम

अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे यांचा ‘राधेश्याम’ चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.  ‘राधेश्याम’चे बजेट 300-350 कोटी होते आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आतापर्यंत 204 कोटी आहे.