पबजी खेळण्यासाठी आईने रिचार्ज नाही केला म्हणून मुलाने केली आत्महत्या

950
प्रातिनिधिक

मध्य प्रदेशमध्ये एका मुलाने आईकडे पबजीसाठी इंटरनेट रिजार्ज करण्यास सांगितले. पण आईने नकार दिल्याने मुलाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत मुलगा आयटीआयचा विद्यार्थी होता.

भोपाळमध्ये नीरज कुशवाह या विद्यार्थ्याला पबजी खेळण्याची सवय होती. तो रात्री दोन वाजेपर्यंत पबजी खेळत असे. नीरजने आपल्या आईकडे पबजी खेळण्यासाठी तीन महिन्याचा रिचार्ज करण्यास सांगितले. पण आईने फक्त एक महिन्याच रिचार्ज करेन असे सांगितले. यावरून नीरजने आपल्या आईसोबत भांडण केले. नंतर जेवण्यासाठी नीरजला बोलावले तेव्हा त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवले होते. खूप वेळ बोलवून जेव्हा तो आला नाही तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. नीरजने गळफास घेतला होता. तातडीने त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एवढ्या क्षुल्लक कारणावर नीरज इतके टोकाचे पाऊल उचलेल असे त्याच्या आईला बिल्कूल वाटले नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या