
सामना ऑनलाईन । पालघर
बोईसर येथे आठवीत शिकणाऱ्या एका मुलाचा विहरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राकेश यादव असे त्या मुलाचे नाव असून बोईसर मधील नवीन राऊत वाडी येथे राहायचा. राकेश हा आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी होता.
मुसळधार पावसामुळे सध्या पालघरमधल्या नद्या, विहरी भरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. राकेश हा मंगळवारी दुपारी शिकवणीसाठी घराबाहेर पडला होता. मात्र संध्याकाळ झाली तरी तो न परतल्याने त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु करण्यात आली. अखेर काल संध्याकाळी बोईसर येथील म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या विहरी शेजारी राकेशची शाळेची बॅग आणि चपला आढळून आल्या. आढळून आली. मात्र विहीर तुडूंब भरलेली असल्याने शोध कार्यात अडचणी येत होत्या. अखेर काल संध्याकाळी उशीरा राकेशचा मृतदेह या विहरितून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
























































