
शिरुर अनंतपाळ तालूक्यातील मौजे डिघोळ येथे शेतीच्या कारणावरुन एका मुलाला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत बिराजदार आणि बालाजी बिराजदार यांची शेती शेजारी शेजारी होती. दोघांमध्ये शेतीवरून वादही होते.भागवत बिरादार यांनी शेतातील विहिरीवरील पाईप जोडाण्यासाठी लूना घेऊन शेतावर गेले. तेव्हा बालाजी बिरादार हे बालाजी बिरादार यांचा मुलगा माधव याला सोबत घेऊन गेले. परंतू ते लवकर परत न आल्याने छोट्या मुलाला तिकडे पाठवले असता तो रडत पळत आला व माधवला विहिरीत ढकलून दिले असे सांगितले. म्हणून त्याच्यासोबत परत विहिरीकडे जाऊन पाहिले असता अंधारामुळे कांहीच दिसले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. बालाजी बिराजदार याने आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप भागवत बिराजदार याने केला आहे. तर भागव बिराजदारनेच आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप बालाजी बिराजदारने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




























































