‘ब्रा’ची पण असते एक्सपायरी डेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औषध, गोळ्या, खाद्य पदार्थ, फळे, भाज्या यांची जशी एक्सपायरी डेट असते तशीच एक्सपायरी डेट अंतर्वस्त्रांचीही असते. ऐकायला आणि वाचायला जरी हे गंमतीशीर वाटत असले तरी हे खरे आहे. पण याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नसते. यामुळे त्या वर्ष वर्षभर एकच ‘ब्रा’ वापरतात. परिणामी त्वचारोगाबरोबरच शरीराची ठेवणही बिघडते.

एका सर्वेक्षणानुसार जगातील 80 टक्के महिला चुकीच्या ‘ब्रा’ वापरत असतात. प्रत्येक महिलेच्या शरीराची, स्तनांची विशिष्ट ठेवण असते. यामुळे प्रत्येकीने ‘ब्रा’ कोणती वापरावी याबद्दल अलर्ट राहणे गरजेचे आहे. यासाठी ‘ब्रा’ विकत घेतानाच ती तुमच्याच साईजची आहे का, हे नीट तपासून घ्यावे. बऱ्याचवेळा ‘ब्रा’वर लिहलेला नंबर हा तुमच्या साईजला परफेक्ट नसतो. अशावेळी नीट तपासूनच ‘ब्रा’ घ्यावी. खूप सैल किंवा घट्ट ‘ब्रा’ वापरणे टाळावे.

bra-11

कुठलीही ब्रा ही दोन ते तीन महिन्याच्यावर वापरू नये. कारण या साठ ते नव्वद दिवसांत तिच्या साईजमध्ये फरक पडलेला असतो.  ब्रा पाण्यात धुतल्याने तिचा कपडा सैल होतो. शिलाईचे दोरेही सैल होतात. त्यामुळे तिचा शेपच बदलतो. अशा ब्रा वापरणे बंद करावे.

खूप घट्ट ब्रा वापरल्याने स्तनांना नीट रक्तपुरवठा होत नाही. स्नायू आकसतात आणि त्यांच्यावर ताण येतो. काहीवेळा ठणकतातही. त्यातून बरेच गंभीर आजार उद्भवू शकतात. चुकीची ब्रा वापरल्याने मानदुखी, पाठदुखी असे त्रास सुरू होऊ शकतात. त्यामुळे अशा ‘ब्रा’ वापरू नयेत. तसेच खूप सैल ब्रा वापरणेही योग्य नाही. त्यामुळे स्तनांचे स्नायू सैल होतात. स्तनांचा आकार बदलतो. हे टाळायचे असेल तर चांगल्या ब्रँण्डेड ब्रा वापराव्यात. तसेच स्तनांचा आकार, शरीराची लांबी रुंदी याही बाबी विचारात घ्याव्यात. या जरा महागड्या जरी असल्या तरी त्यांचा दर्जा उत्तम असतो. यामुळे योग्य ब्राची निवड करावी.