
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाची सध्या इंडस्ट्रीत चर्चा सुरू आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी दमदार कामगिरी केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ला वॉल्ट डिज्नी स्टुडिओ पिक्चर्सच्या ग्लोबल रिलीज पॅलेंडरमध्ये स्थान मिळाले आहे. म्हणजेच हा साय-फाय ट्रायोलॉजी चित्रपट 9 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाईल.
डिज्नी स्टुडिओच्या 2022 च्या पॅलेंडरमध्ये ‘ब्रह्मास्त्र’च्या व्यतिरिक्त हॉलीवूडच्या ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’, ‘थॉर- लव्ह अँड थंडर’,‘ब्लॅक पँथर’सह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळी आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. त्याचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. रणबीर-आलिया यांच्यासह अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया, आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


























































