
तालुक्यातील ओझे येथे शनिवारी 60 वर्षीय शेतमजुराने 10 मिनिटे बिबट्याच्या मादीशी झुंज देत तिला पिटाळून लावत आपले प्राण वाचवले.
बाळू धोंडीराम धुळे हे प्रवीण शिंदे यांच्या शेतात ऊसाला पाणी देण्याचे काम करत होते. अचानक बिबटय़ाची मादी समोर येऊन डरकाळ्या पह्डू लागली. घाबरलेल्या धुळे यांनी खाली बसून जोरजोरात हातातली काठी फिरवण्यास सुरुवात केली. तिने तीनवेळा धुळे यांच्यावर झेप घेत पकडण्याचा प्रयत्न केला. वाचणे अशक्य असल्याचे वाटत असतानाच शेतात बछडय़ांची हालचाल जाणवल्याने तिचे लक्ष विचलीत झाले. तेवढय़ात धुळे यांनी काटेरी झाडाझुडपातूनच पळ काढत जीव वाचवला. त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. जवळपास दहा मिनिटे ही झुंज चालली होती. बछडय़ांना इजा पोहचू नये म्हणून मादी आक्रमक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

























































