
ब्राझीलमध्ये खदानीत काम करणाऱया एका मजुराला 700 किलो सोने सापडले. चिको ओसोरियो असे या मजुराचे नाव आहे. जुन्या खदानीत खाणकाम करताना त्याला हे सोने सापडले. हे सोने 24 कॅरेटचे असून याची बाजारात किंमत तब्बल 914 कोटी रुपये इतकी आहे. ओसोरियाने एक हिस्सा बँकेत जमा केला आहे, तर दुसरा हिस्सा विकून जहाज खरेदी केले आहे. सरकारने 1992 साली सुरक्षेच्या कारणामुळे ही खदान बंद केली होती, परंतु ओसोरियाने या खदानीत आपले काम सुरूच ठेवले होते. ओसोरियाला अचानक सोन्याची खाण मिळाल्याने तो एका रात्रीत कोटय़धीश झाला आहे.
























































