‘ब्रेक द चेन’ आदेशात आणखी काही सेवांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आजपासून निर्बंध लागू केले. त्यातून काही आवश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यात आणखी काही सेवांचा आज समावेश करण्यात आला.

‘या’ सेवाही आवश्यक सेवा

सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
पेट्रोल पंप, पेट्रोलियम उत्पादने
डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी संबंधित सेवा
शासकीय व सरकारी सुरक्षा सेवा
फळ विक्रेते

‘ही’ खासगी कार्यालये सुरू राहतील

रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स
शेअर बाजार, डिपॉझिट अॅन्ड क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स अशा सेबी मान्यताप्राप्त संस्था
मायक्रो फायनान्स संस्था
नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
वकिलांची कार्यालये
कस्टम हाऊन एजन्ट्स
लस, औषधे, जीवरक्षक औषधांची वाहतूक करणारे ट्रान्सपोर्ट ऑपरेटर

संचारबंदीत प्रवास करण्यासाठी नियम

औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत ये-जा करता येणार
रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बस, विमाने यातून ये-जा करणाऱया व्यक्तींना त्याचे अधिकृत तिकीट जवळ बाळगावे लागेल.
घरकाम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांना रात्री 8 नंतर ये-जा करण्यासंबंधी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल.
परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असेल तर हॉलतिकीट जवळ बाळगावे लागेल.
धार्मिक स्थळी असणारा विवाह, अंत्यसंस्कार यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून परवानगी देता येईल.
शनिवार किंवा रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन परिस्थिती पाहून काही अटींवर परवानगी देऊ शकेल.

खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल करणार!

कोरोनाच्या संकटातही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी केली जात आहे. यामुळे रुग्णांवर योग्य वेळी उपचार होणे कठीण जात असून खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱयांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणे सोपे होणार आहे. राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना जावे लागतेय.