
पूर्व उपनगरातील विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा बांधकामांमुळे तिथे पूल उभारण्यात अडचणी येत होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाने या बेकायदा बांधकामांवर आज कारवाई करून ती हटवली. त्यामुळे आता पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी हा रेल्वे पूल बांधणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. विद्याविहार (पूर्व) येथील 15 अनधिकृत झोपडय़ांमुळे या रेल्वे पुलाच्या बांधकामाचे काम करता येत नव्हते. महानगरपालिकेने या झोपडया हटवल्यानंतर या रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या आड येत होत्या. ही बांधकामे तोडल्याने मोकळय़ा झालेल्या जागी पुलाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल अशी महापालिकेच्या अधिकाऱयांनी माहिती दिली.



























































