
मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता कर्नल प्रसाद पुरोहित यांना ‘ब्रिगेडियर’ पदावर पदोन्नती होणार आहे. यासंदर्भात सशस्त्र बल न्यायाधिकरणाने पुरोहित यांच्या बाजूने निकाल दिला होता. पुरोहित यांची निवृत्ती रद्द करत त्यांना पदोन्नती देण्यास लष्कराने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाने संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली होती.
वर्ष 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. जवळपास 9 वर्षांनी 2017 मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर ते लष्करात रुजू झाले होते. त्यानंतर जुलै 2025 मध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर त्यांना सप्टेंबर 2025 मध्ये कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर आता त्यांना ब्रिगेडियर पदी बढती मिळणार आहे. न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला.
शिवसेनेचे मुंबई महापालिका कार्यालयीन पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मुंबई महानगरपालिका कार्यालयीन पक्ष पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपनेते म्हणून नगरसेवक सचिन पडवळ, शिवानी परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून साईनाथ दुर्गे यांची निवड करण्यात आली आहे. उपप्रतोदपदी गीता भंडारी, विश्वास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. उपसचिव पदी अंकित प्रभू, गितेश राऊत, माधुरी मांजरेकर, दीपक सावंत आणि निशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.



























































