तेंडुलकर-लारा आमने सामने, हिंदुस्थानातील टी-20 स्पर्धेत खेळणार

591

हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर व वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू ब्रायन लारा हे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकणार आहेत. जागतिक टी-20 माजी क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत दोघांचाही सहभाग असणार आहे. पुढल्या वर्षी हिंदुस्थानात 2 ते 16 फेब्रुवारीदरम्यान ही मालिका होणार आहे.

हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या पाच देशांतील खेळाडूंचा सहभाग असलेली जागतिक टी-20 मालिका दरवर्षी खेळवण्यात येत आहे. पुढल्या वर्षी या मालिकेचे आयोजन हिंदुस्थानात करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा यांच्यासह या मालिकेत हिंदुस्थानचा वीरेंद्र सेहवाग, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा जॉण्टी ऱहोडस् आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली यांचाही समावेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या