
सामना ऑनलाईन । कोलंबो
श्रीलंकेचा माजी आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या याच्यावर ‘आयसीसी’ने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्याला 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सनथ जयसूर्या श्रीलंकन निवड समितीचा अध्यक्ष असताना आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक त्याची चौकशी करायला गेले होते. यावेळी सनथ जयसूर्याकडून चांगली वागणूक मिळाली नाही. तसेच आयसीसीच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याचे काम तो करीत होता. त्यांना आपले काम निष्पक्षपातीपणे करू देत नव्हता. त्यामुळे आयसीसीकडून सनथ जयसूर्यावर दोन गंभीर आरोप करण्यात आले आहेत.



























































