
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. हा खास क्षण कायम आठवणीत रहावा आणि उत्साव वाढावा यासाठी सध्या विवाहसोहळ्यात नवरदेव-नवरीची ग्रँड एन्ट्री दाखवली जाते. कधी बुलेटवरून तर कधी वेगळ्या पद्धतीने दांपत्य विवाहस्थळी पोहोचते. मात्र छत्तीसगडेमध्ये असाच एक वेगळा प्रयत्न करणे नवरदेव-नवरीच्या जीवावर बेतले असते.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे विवाहसोहळ्यात नवरदेव आणि नवरीच्या ग्रँड एन्ट्री करणे महागात पडले. एन्ट्रीदरम्यान हार्नेस तुटल्याने नवदांपत्य 12 फुटांवरून खाली पडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रायपूर येथील तेलिबांधा पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या एका हॉटेलमध्ये विवाहसोहळा सुरू होता. या विवाहसोहळ्याचे कॉन्ट्रॉक्ट एका इव्हेंट कंपनीला देण्यात आले होते. विवाहसोहळ्यात नवरदेव-नवरीची ग्रँड एन्ट्री करण्याचे ठरवले. यासाठी गोल रिंग आणि हार्नेसचीही व्यवस्था करण्यात आली. या गोल रिंगवर बसून नवरदेव-नवरी यांची विवाहसोहळ्यात एन्ट्री झाली. मात्र याचवेळी हार्नेस तुटला आणि ही जोडी खाली स्टेजवर पडली.
दरम्यान, या अपघातात नवरदेव-नवरीला किरकोळ दुखापत झाली आहे. लग्नाला आलेल्या लोकांनी इव्हेंट कंपनीला धारेवर धरले. प्रकरण तापत असल्याचे पाहून इव्हेंट कंपनीने आपली चुकी मान्य केल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
एका विवाहसोहळ्यात नवरदेव आणि नवरीच्या ग्रँड एन्ट्री करणे महागात पडले. एन्ट्रीदरम्यान हार्नेस तुटल्याने अपघात झाला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. pic.twitter.com/GlKIEGbN1l
— Saamana (@SaamanaOnline) December 12, 2021




























































