ब्रिगेडियर ए. के. नाईक यांची रेल्वेखाली आत्महत्या

पुणे शहरातील लष्करी विभागाच्या एएफएमसी येथे कार्यरत असलेल्या ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. ते एएफएमसी हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.

अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी होते. आज सकाळी ते सरकारी गाडी आणि चालकासह पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते. ते ड्रायव्हर बोडके यांना मी एमसीओ मधून जाऊन येतो असे सांगून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गेले. त्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी उद्यान एक्सप्रेस गाडीचा इंजिन पुढे झोकून देऊन आत्महत्या केली.

त्यांच्याकडे सुसाईड नोट मिळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येची माहिती मुलगा अभिषेक नाईक याना कळवली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाईक प्लॅटफॉर्म नंबर एक याठिकाणी फिरत असताना दिसत होते. त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या