ब्रिटनमधील जोडप्याचा अनोखा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमधील एका जोडप्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. उंचीतील फरकामुळे या जोडप्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. जेम्स आणि क्लोई लस्टेड या नवरा-बायकोच्या उंचीमध्ये तब्बल दोन फुटांचा फरक आहे. जेम्सची उंची 3 फूट 7 इंच तर क्लोईची उंची 5 फूट 5 इंच एवढी आहे.

अभिनेता आणि टीव्ही प्रेझेंटर असलेल्या जेम्सला डायस्ट्रोफिक डायस्प्लासिया हा दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे. यामुळे आपले कधी लग्न होईल असे त्याला वाटत नव्हते. पंरतु पेशाने शिक्षिका असलेल्या क्लोईसोबत 5 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. आता त्यांना ऑलिव्हिया नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. 2 जूनला विवाहित जोडप्यांमधील सर्वात जास्त उंचीच्या फरकाचा विक्रम त्यांनी मोडला आहे. या दोघांची भेट 2012मध्ये एका पबमध्ये झाली. क्लोईला नेहमीच उंच पुरुष आवडत होते. परंतु जेम्सच्या प्रेमात पडल्यानंतर तिचा विचार बदलला. त्यानंतर समाज काय म्हणेल याची पर्वा न करता तिने त्याची आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवड केली.