पतीचे कोरोनामुळे निधन, विधवा महिलेवर दीराचा बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर विधवा महिलेवर तिच्याच दीराने बलात्कार केला आहे. इतकेच नाही महिलेने पोलिसांत धाव घेतली म्हणून दीराने पीडित महिलेला मारहाण केली आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात एका महिलेच्या पतीचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निधन झाले. नंतर या विधवा महिलेवर तिच्याच दीराने बलात्कार केला. महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आणि हे प्रकरण आपसांतच मिटवून टाका असा सल्ला दिला.

नंत महिला जेव्हा घरी आली तेव्हा दीर आणि त्याच्या बहीणींनी मिळून महिलेला जबर मारहाण केली. इतकेच नाही तर तिच्या आठ वर्षाच्या मुलालाही त्यांनी मारहाण केली.

अखेर ही बाब वरिष्ठ पोलिसांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी पीडित महिलेचा दीर आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या