स्वप्न पाहता पाहता जुळ्या बहीणीला भोसकले, लहान मुलाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका 17 वर्षाच्या मुलाने आपल्या बहींणीला भोसकले आहे. त्यात बहीणीचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण तेव्हा आपण स्वप्न पाहत होतो असे कारण भावाने दिले आहे.

अमिरिकेत बेंजामिन इलियॉट हा 17 वर्षीय मुलगा आपल्या बहीण आणि पालकांसोबत राहत होता. बेंजामिन आणि मेघन हे जुळे भावंड होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास बेजांमिनने मेघनच्या गळ्यात चाकू भोसकला. यावेळी बेंजामिन स्वप्न पाहत होता. बेंजामिनने स्वप्नात चाकू फिरवला परंतु प्रत्यक्षात चाकू त्याच्या बहीणीला लागला. यात मेघन गंभीर जखमी झाली. जेव्हा बेंजामिनला जाग आली तेव्हा मेघनच्या गळ्यातून रक्त वाहत होते. बेंजामिनने उशी धरून रक्त थांबवण्याचा प्रयत्नही केला परंतु त्यात मेघनचा मृत्यू झाला.

साधारण बहीण भावंडाप्रमाणेच मेघन आणि बेंजामिन होते अशी माहिती शेजार्‍यांनी दिली. दोघांमध्ये खूप प्रेम होते असेही शेजार्‍यांनी सांगितले. बेंजामिनला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खटला सुरू आहे. तो दोषी आढळल्यास त्याची रवानगी तुरुंगातही होऊ शकते.