सायबरबुलिंग, ऑनलाईन शोषणाला आळा, ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप कार्यान्वित

ब्रश ऑफ होपच्या मोबाईल ऑप्लिकेशन, चॅटबॉट व सुधारित वेबसाईटचे नुकतेच अनावरण करण्यात आले.

सायबरबुलिंग आणि सेक्सटॉर्शन ही समाजासमोरील गंभीर  समस्या आहे. समाजातील प्रत्येक घटक विशेषतः तरुण वर्ग या समस्येने ग्रस्त आहे. यातील पीडित याबाबत कुठेही बोलत नाही. याचाच गैरफायदा घेतला जातो. पीडितांनी न घाबरता पुढे येऊन या अपप्रवृत्तीचा सामना करावा यासाठी मोबाईल ऑप्लिकेशन, चॅटबॉट आणि वेबसाईटची निर्मिती ब्रश ऑफने केली आहे.

या मोबाईल अॅपद्वारे पिडीतेस कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन आदी सेवा गोपनीयता बाळगून निःशुल्क मिळणार आहेत, असे ब्रश ऑफ होप संस्थेच्या संस्थापिका डॉ. शीतल गगराणी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव (आयपीएस), महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता जॅकी भगनानी आदी मान्यवर उपस्थित होते.