खेरवाडीत पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; 48 तासांत गुन्ह्याची उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीजवळ तिघांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. गुन्हा करून तिघेही पसार झाले. पण प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालकाने वेळीच याबाबत पोलिसांना सांगितल्याने आरोपींना 48 तासांच्या आत गजाआड करण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले. शासकीय वसाहतीमधील इमारत क्रमांक 6 समोर दोघे जण एका तरुणाला रस्त्यात आडवा पाडून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत होते, तर त्यांचा तिसरा साथीदार सर्व्हिस रोडवर दुचाकी घेऊन उभा होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षाचालकाने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी अचूक तपास करीत अवघ्या 48 तासांच्या आत मुकेश निशाद, आदिल सिद्धीकी आणि जितेंद्र कांबळे या तिघांना पकडले. चौकशीत तिघांनी गुह्याची कबूली दिली. पूर्ववैमनस्यातून ज्ञानेश्वर उपाध्याय याची हत्या केल्याचे आरोपींनी मान्य केले.