
जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये गेल्या चार दिवसांतील तेजीनंतर बुधवारी दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात शेअर घसरले. बुधवारी सकाळच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी घसरून 82.71 वर आला.
शेअर बाजाराचे कामकाजाला सकारात्मक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर बाजार 140.5 अंकांनी घसरून 60,980.85 वर आला. एनएसईचा निफ्टी 36 अंकांनी घसरून 18,109.40 वर आला.
भारती एअरटेल, टायटन, मारुती, इन्फोसिस, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा प्रमुख पिछाडीवर होते.
तर सन फार्मा, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर वधारले.
आशियातील इतरत्र, सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात सकारात्मक वातावरण होते, तर टोकियोत मात्र घसरण होती.
वॉल स्ट्रीटमध्येही मंगळवारी नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.
बुधवारी सकाळच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी घसरून 82.71 वर आला.




























































