
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून शुक्रवारी घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळून लावत एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली आहे. इम्तियाज अहमद असे अटक केलेल्या घुसखोराचे नाव असून तो पाकिस्तानच्या शकरगढ जिल्ह्यातील परवल गावचा रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्याला पुढील कारवाईसाठी लाखा येथील बेहराम पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले आहे.
जवानांना सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्याने 160व्या बटालियनने तात्काळ कारवाई केली. कारवाईत जलालाबादजवळ हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. मागील काही दिवसांत हिंदुस्थानी सैनिकांनी सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत.
 
             
		





































 
     
    





















