
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) च्या जवानांची टीम ‘स्वच्छ भारत-स्वच्छ हिमालय’ आणि ‘हम फिट तो इंडिया फिट’ या मोहिमेंतर्गत चार उंच पर्वत सर करणार आहे. ही मोहिम 34 दिवस चालणार असून यात बीएसएफ जवान, आरोग्य कर्मचारी आणि परिवहन कर्मचाऱ्यांसह एकूण 35 जण सहभागी होणार आहेत. हे सर्व जण हिमालयातील ज्या सर्वात उंच चार पर्वतांना सर करणार आहे. त्यामध्ये लाहौल आणि लडाख क्षेत्रातील माऊंट युनम (6111 मीटर उंच), माऊंट थुग्जे (6128 मीटर उंच), माऊंट धुग्जे पूर्व (6080 मीटर उंच) आणि माऊंट मेंटोक (6250 मीटर उंच) पर्वतांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत 14 हजार फुटापासून 20,500 फुटांच्या उंचीपर्यंत शिबिरातून कचरा गोळा करण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि ग्लोबल वार्ंमगला थांबवणे हा संदेश दिला जाणार आहे.