
सरकारी कंपनी बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी काही दमदार प्लॅन्स बाजारात आणले आहेत. यात जास्तीत जास्त इंटरनेट डाटा आणि कॉलिंग टाइम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कंपनीने दिवसाला 3 जीबी डाटा आणि फ्री कॉलिंग देणारा दमदार प्लॅन देखील लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे या प्लॅन फक्त 78 रुपयांचा आहे.
बीएसएनएलला 78 रुपयांचा प्लॅन दिवसाला 3 जीबी डाटा आणि 250 एफयूपी कॉलिंग मिनिटं युजर्सला देतो. याची वैधता 8 दिवसांची असून यासोबत कंपनी इरॉज नाऊचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. मात्र हा प्लॅन बीएसएनएलच्या काही विशिष्ट सर्कलमध्येच उपलब्ध आहे.
बीएसएनएलचा आणखी एक 247 रुपयांचा प्लॅन असून यात युजर्सला दिवसाला 3 जीबी डाटा आणि फ्री कॉलिंग मिळते. याची वैधता 36 दिवस आहे. तसेच दिवसाचा 3 जीबी डाटा संपल्यावर इंटरनेट स्पीड 80 केबीपीएस एवढा होतो. बीएसएनएलच्या सर्व सर्कलमध्ये हा प्लॅन उपलब्ध आहे. तसेच 1999 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवस असून दिवसाला 3 जीबी डाटा, 100 एसएमएस आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते.
























































