लॉकडाऊनमध्ये बजेट स्मार्टफोन्सची मागणी वाढली, फ्लिपकार्टच्या अहवालातील माहिती

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली. याकाळात हिंदुस्थानात बजेट स्मार्टफोन्स म्हणजेच परवडणार्‍या मोबाईलची मागणी वाढली आहे. पूर्वी कॅमेरा फीचर ला पसंती दर्शवणारे हिंदुस्थानी ग्राहक आता डिस्प्ले, बॅटरी आणि इतर फीचरकडे वळाले आहेत.

अनेकजण आपली व्यावसायिक कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमांचा अवलंब करत आहेत, तर अनेक जण रोजच्या शाळेसाठी फोन व अन्य डिजिटल उपकरणांचा वापर करत आहेत. या काळात फ्लिपकार्टने देशभरात लोकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषत: स्मार्टफोन विभागात. इथे सातत्याने व्यापक किमतींच्या पर्यायांमध्ये विविध स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत आणि या उत्पादनांची सुरक्षित आणि निर्जंतुक पुरवठा साखळी कायम राखत डिलिव्हरी करण्यात त्यांनी लक्षणीय काम केले आहे. या अहवालात फ्लिपकार्टने नमूद केलेल्या नोंदींमधून लक्षात येते की हिंदुस्थानात घरातूनच कसे शिक्षण घेत आहे आणि स्मार्टफोन विभागातील काही रंजक निष्कर्षही यात आहेत.

बजेट आणि परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन्सना अधिक मागणी

बहुतांश लोक सध्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहेत.  प्रत्येकाच्या मनोरंजन, व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असल्याने एकाच घरात एकाच प्रकारच्या अनेक उपकरणांची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे, अनेक लोक बजेटबाबत जागरुक झाले आहेत. विशेषत: स्मार्टफोन घेताना तो महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे, कोविडपूर्व काळाच्या तुलनेत जूनपासून फ्लिपकार्टवर 10 हजार रुपयांखालील उत्पादनांचा शोधण्याचे प्रमाण 60 टक्क्यांनी वाढले आहे. पाच कोटींहून अधिक फ्लिपकार्ट वापरकर्त्यांनी 10 हजार रुपयांखालील बजेट स्मार्टफोनमध्ये रस दाखवला आहे.

या विभागात बॅटरी क्षमता आणि डिस्प्लेचा आकार याबाबतीत 5000 mAh आणि 6.22 इंची स्क्रीन हे मापदंड ठरले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यात या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. अनेक ब्रँड्सनी या किंमतीत 6000 mAh बॅटरी आणि 6.82 इंची डिस्प्ले असलेले फोन सादर केले आहेत.

स्मार्टफोनची बॅटरी हे महत्त्वाचे वैशिष्ट्य

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्टफोनच्या वापराच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे आणि आता फोनवर एकाच वेळी अनेक कामे केली जाणे, ही काळाची गरज ठरत आहे. लोक स्मार्टफोनवर बराच वेळ घालवतात आणि त्यामुळे आता बॅटरीच्या कालावधीबाबत तडजोड करता येण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. फ्लिपकार्टवर बॅटरीशी संबंधित बाबींचा शोध घेण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. मार्चपासून हा शोध जवळपास दुप्पट झाला आहे.

लोकप्रिय निवड

या काळात परवडणाऱ्या दरातील फोनची मागणी वाढल्याने अनेक ब्रँड्सनी अनेक तास सहज चालतील असे नवे फोन आणले. यातील काही लोकप्रिय उत्पादने  रीअलमीची सी सीरिज (सी2 आणि सी3), शाओमीची रेडमी 8 आणि 8A आणि इन्फिनिक्सची हॉट सीरिज शिवाय फ्लिपकार्टवर तीन नव्या कंपन्याही आल्या – गिओनी, आयटेल आणि टेक्नो. या ब्रँड्सनी देशभरात ग्राहकांचा भक्कम पाया उभा केला आहे.

मोठा डिस्प्ले, मोठी स्क्रीन असलेल्या स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी रीअलमीने त्यांच्या लोकप्रिय सी सीरिजमध्ये (रीअलमी सी11, सी12 आणि सी15) तीन नवे फोन सादर केले. या तीन फोनमधील मुख्य विश्वासार्ह घटक (आरटीबी) म्हणजे त्यातील बॅटरी (6000 mAH पर्यंत) आणि डिस्प्ले (6.53 इंचीपर्यंत).

इन्फिनिक्सने आपली अत्यंत लोकप्रिय हॉट सीरिज आता इन्फिनिक्स हॉट 9 आणि हॉट 9 प्रो अशी विस्तारली आहे. या दोन्ही फोनमध्ये 5000 mAHची बॅटरी आणि 6.6 इंची डिस्प्ले आहे. त्यांनी इन्फिनिक्स स्मार्ट 4 प्लस हा अत्यंत परवडणाऱ्या दरातील फोन आणला आहे. प्रामुख्याने घरातून शिकण्यासाठी वापर यावर या फोनचा भर आहे. या ब्रँडने उत्पादनाचे प्रमोशन करण्यासाठी या विषयावर एक फिल्मही बनवली आहे. या फोनमध्ये 6.8 इंची स्क्रीन आणि 6000 mAHची बॅटरी आहे. 6000 mAH बॅटरी असणारा हा सर्वात परवडणाऱ्या किमतीतील फोन आहे.

जिओनीने जिओनी मॅक्स या स्मार्टफोनद्वारे भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे आयटेल व्हिजन 1 3 जीबी, टेक्नो स्पार्क पॉवर 2 आणि टेक्नो स्पार्क पॉवर गो 2020 या इतर फोन्सनाही चांगली मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या