झुकलेली इमारत अखेर कोसळली, आजूबाजूच्या इमारतीतील रहिवासी अडकले

892
building-collapse-ulhasnaga

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

उल्हासनगर येथील महक ही इमारत मंगळवारी कोसळली. ही इमारत सोमवारी थोडी झुकली होती. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना तेव्हाच बाहेर काढण्यात आले होते. मात्र इमारत कोसळल्यानंतर मातीचा ढिगारा आजूबाजूच्या इमारतींवर कोसळला. त्यामुळे अन्य इमारतींमध्ये राहणारे काही जण अडकून पडले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात येत आहे.

building-collapse-in-ulhasn