मुंबई : दुरुस्ती सुरू असताना इमारतीचा भाग कोसळला, 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्ट येथे संध्याकाळी दुरुस्ती सुरू असलेल्या म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत  6 जणांचा मृत्यू झाला आहे.  अग्रिशमन दलाने या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत  23 जणांची सुखरूप सुटका केली आहे.

फोर्ट येथील मिंट रोडवरील असलेल्या भानुशाली या उपकरप्राप्त म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि पोस्ट ऑफिस मुख्यालयासमोर ही सहा मजली इमारत आहे. इमारत धोकादायक झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू होते. यातील काही कुटुंंबांना इतरत्र हलवण्यात आले होते. मात्र, तरीही काही कुटुंबे या इमारतीत राहत होती. आज पावणेपाच वाजता इमारतीचा उत्तरेकडील काही भाग कोसळला. दुर्घटनेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच दोघा महिलांचा मृत्यू झाला आहे. या महिलांची ओळख पटलेली नाही तर तिघा जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील नेहा (४५) यांची प्रकृती गंभीर असून भालचंद्र कानू हे किरकोळ जखमी झाले आहेत तर एकाचे नाव समजू शकलेले नाही. आqग्नशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

‘एनओसी’ देऊनही दुरुस्ती झाली नाही!
भानुशाली इमारत म्हाडाची होती. २०१९ मध्ये दुरुस्तीची पालिकेने परवानगी दिली होती. तरीही का दुरुस्ती झाली नाही, याबाबत म्हाडा प्राधिकरण चौकशी करेल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालिंसह चहल यांनी दिली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
भानुशाली इमारतीच्या मालकाला इमारत रिकामी करण्याबाबत नोटीस दिली होती. प्रत्येक माळ्यावर ४ ते ५ घरे आहेत. इमारतीत राहणाNया कुटुंबांना बाहेर काढणे मालकाचे काम होते. पण त्यांनी ते केले नाही. अशा मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मालाडमध्ये दुमजली चाळ कोसळली, दोन ठार, १३ जखमी
मालाड पश्चिमेला आज दुपारी एक दुमजली चाळ कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले.

आज दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी मालाडमधील मालवणी गेट नंबर ५ जवळ असलेले ‘प्लॉट नंबर ८/बी’ वरील दुमजली चाळ कोसळली. आग्निशमन दलाने ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या १५ जणांना बाहेर काढले. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फैजल सय्यद (१८) आणि अंजुम शेख (२३) अशी त्यांची नावे आहेत.

मरोळमध्ये चाळीचे छत कोसळले
मरोळमधील चर्च रोडजवळ असलेल्या बांडेरवाडा येथे इकबाल मंजिल चाळीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले तर दोघे वृद्ध पहिल्या मजल्यावर अडकले. दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे तर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू होते.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी घटनास्थळी धाव घेतली. पालिका आयुक्त इकबालिंसह चहल आणि पोलीस आयुक्त परमबीर िंसह यांंच्याकडून माहिती घेऊन मदत आणि बचावकार्याचा आढावाही घेतला.