
सामना ऑनलाईन । मुंबई
घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. रमाबाई नगरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावरील वयस्कर जोडपे थेट पहिल्या मजल्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रमाबाई नगर येथे दक्षता सोसायटीच्या ‘सी – 2’ या इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील घराचा स्लॅब सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास कोसळला. याकेळी दुसऱया माळ्याकरील शिकाजी कुटे (60) व त्यांच्या पत्नी लक्ष्मी कुटे (57) हे जखमी झाले. त्यांना कोहिनूर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटे यांच्या मणक्याला तर त्यांच्या पत्नीच्या हाताला प्रॅक्चर झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. आज सकाळी कुटे व त्यांची पत्नी दुसऱ्या मजल्यावर बाहेरील रूममध्ये पलंगावर बसले होते. मात्र यावेळी स्लॅब अचानक कोसळला. यामध्ये कुटे यांच्या मणक्याला तर पत्नीला पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
पोलीस आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी रमाबाईनगरमध्ये दक्षता सोसायटी 1996 मध्ये बांधण्यात आली आहे. या इमारतीत याआधीही घरामधील स्लॅब कोसळल्याचे प्रकार समोर आले आहेत. आज घडलेल्या घटनेत पहिल्या मजल्यावरील घराच्या स्लॅबच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी स्लॅब पूर्णपणे धोकादायक झाल्याचे दुसऱ्या मजल्यावरील कुटे कुटुंबीयाने पहिल्या मजल्यावर काम करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र तरीदेखील काम सुरू ठेवल्याचे कुटे यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, धोकादायक इमारतींबाबत अनेक वेळा तक्रार करूनही सोसायटीचे पदाधिकारी किंवा पालिका प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती किंवा कार्यवाही केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.



























































