मलकापुरात भरारी पथकाने पकडले सुमारे अडीच लाख रुपये

821

शनिवार 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. दरम्यान यासाठी निवडणूक विभागाने येणार्‍या जाणार्‍या वाहनांची कसुन तपासणी सुरु आहे. याच दरम्यान मलकापूर येथे शनिवारी रात्री 9.30 वाजता शेलगाव मुकुंद भरारी पथकाचे पथक प्रमुख पी. टी. गोरे व पथकातील इतर सदस्यांनी वाहन क्र. एमएच 15 इबी 2477 मधून अविनाश मधुकर तायडे, रा. माटोडा यांचे अडीच लाख रुपये जप्त केले. सदर कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी सुनील विंचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मलकापूर तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नांदुरा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल तायडे तसेच नोडल अधिकारी गजानन राजगडे, मनोज सातव, दिलीप अढाव, महेंद्र पाटील, निलेश अढाव, प्रवीण घाटे आचारसंहिता कक्ष यांच्या समन्वयाने केली आहे. सदर रकमेबाबत कोणताही पुरावा सादर केला नसल्याने ती जप्त करून मलकापूर येथील कोषागारात जमा करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या