बुलढाणा – आज 23 जण पॉझिटिव्ह आढळले, 54 रुग्णांना मिळाली सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ११३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून २३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २१ व रॅपिड टेस्टमधील २ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९९ तर रॅपिड टेस्टमधील १४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ११३ अहवाल निगेटिव्ह आहेत.

आज ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत १५१४७ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १६८८ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या १६८८ आहे.

आज रोजी ५८७ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १५१४७ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण २५८० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १६८८ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ८५० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत ४२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.