भारतमातेचे रक्षण करण्यात बुलढाणा जिल्ह्याचे मोठे योगदान ; आजपर्यंत 35 जवानांना वीरमरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बुलढाणा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील हजारो तरुणांनी सैन्यात आपले योगदान दिले आहे. जिल्ह्यातील ३३ जवानांना आतापर्यंत वीरमरण आले तर १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ दलाच्या २ जवानांना दहशतवाद्याच्या हल्ल्यात वीरमरण आले असून लढताना २६ सैनिक जायबंदी (अपंग) झाले आहे. त्यापैकी एका जवानाला शौर्यचक्र मिळाले आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या ५९३६ जवानांपैकी ४२२७ जवान हयात आहे. तर १७०९ जवान मरण पावले आहे. तर आज जिल्ह्यातील हजारो जवान सिमेवर तैनात आहे.

स्वातंत्र्यलढ्यात जसे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे योगदान आहे तसे स्वात्रंत्र्यप्राप्तीनंतर देखील बुलढाणा जिल्ह्याने हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी हजारो तरुणांनी सैन्यात भरती होऊन जिवाची बाजी लावून वेळप्रसंगी जिवाचे बलिदान दिले असल्याच्या घटना आहे. जिल्ह्याचा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा सैन्य भरतीचा इतिहास पाहिला तर हजारो तरुण सैन्यात भरती झाले आहे व त्यांनी भारतमातेची सेवा केली आहे व करीत आहे. ५९३६ सेवेतून निवृत्त झाले आहे. त्यापैकी ४२२७ माजी सैनिक जीवंत आहे तर १९०७ मरण पावले आहे. ३५ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले आहे. तर २६ सैनिक जायबंदी झाले आहे.

वीरमरण आलेल्या ३३ सैनिकांमध्ये चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथील गोपाळ इंगळे, बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाडे येथील सदाशिव घुबे, लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील विठोबा खरात, चिखली येथील त्र्यंबक पवार, नांदुरा तालुक्यातील खैरा येथील भगवान ताकतोडे, मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील सिताराम डुकरे, शेगाव येथील निरंजन शेगोकार, बुलढाणा तालुक्यातील जांब येथील नामदेव जाधव, मोताळा तालुक्यातील खरबडी येथील सुरेश राणे, देऊळगावराजा तालुक्यातील साटेगाव सावंगी येथील भिमराव गिते, खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील लक्ष्मण वेरुळकर या सैनिकांनी भारत पाकच्या १९७१ च्या लढाईत जीवाचे बलीदान दिले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सिमेवर तसेच काश्मिर खोर्‍यात, सैन्याकडून वेगवेगळ्या झालेल्या चकमकीमध्ये  चिखली येथील भानुदास शिंदे, मोताळा तालुक्यातील राजूर येथील दिनकर गवई, शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील बाबुराव वानखेडे, सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा येथील कुंडलीक मुंढे, देऊळगावराजा तालुक्यातील खैरव येथील नानाभाऊ लहाने, सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका येथील रामदास वाघ, शेगाव येथील गणेश गावंडे, बुलढाणा शहरातील नारायण कुळकर्णी, चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथील रामधन शिंदे, बुलढाणा तालुक्यातील करडी-धाड येथील पांडुरंग काकफळे, चिखली तालुक्यातील किन्होळा श्रीकृष्ण बाहेकर, मेहकर तालुक्यातील गुंजन खेड येथील रामहरी गायकवाड, तर बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील धरमराज हनवते, चिखली तालुक्यातील रोहडा येथील कैलास गवई, बुलढाणा सुंदरखेड येथील मनोजकुमार वानखडे, बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील शाम पवार, देऊळगावराजा तालुक्यातील मांडवा येथील योगेश दिनकर दराडे, मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथील वसंता आनंदा उबाळे तर अर्धसैनिक बलामधील सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील गणेश खरात, जळगावजामोद येथील सदाशिव लक्ष्मण इंगळे, चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील सिताराम काटकर आणि कव्हळा येथील बबन तुकाराम डाळिंबकर यांचा समावेश आहे. १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ दलाच्या २ जवानांना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आले. मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत व लोणार तालुक्यातील गोवर्धन तांडा येथील नितीन शिवाजी राठोड यांचा समावेश आहे.

तर शत्रुंशी लढताना अपंगत्व आलेल्यांमध्ये देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रानंदई येथील रामदास भिकाजी बनसोडे, बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील अशोक श्रीपत शेळके, चिखली येथील आश्रुबा कडूबा वाघ, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रमेश चंद्रभान बाहेकर, शेगाव येथील गजानन रावजी गवते, चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथील प्रदीप ज्ञानेश्वर भुतेकर, नांदुरा येथील रामचंद्र ओंकार ताठे, मोताळा तालुक्यातील शेलापुर येथील अनिल नामदेव चिम, लोणार तालुक्यातील मांडवा, बालचंद्र खुशालराव तारे, बुलढाणा तालुक्यातील सव येथील नंदकिशोर गाढे, मलकापूर येथील रामदास मोतीराव ताठे, बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील नारायण तुकाराम भराड, शेगाव येथील कैलास तायडे, बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील भाऊराव रामराव घुबे, चिखली तालुक्यातील भानखेड येथील गोविंद मुकूंद सुरडकर, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथील अण्णा दगडू शिंगणे, चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा, बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथील दौलत जाधव व गुलाबराव रामराव पवार, सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील रशीद खान, बुलढाणा तालुक्यातील शिरपुर रामदास शेळके, बुलढाणा तालुक्यातील हतेडी प्रभाकर रामभाऊ जाधव, बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील सिताराम साळवे, बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील राजु दौलत खंडागळे व पुंडलीक गोविंदा सातव, बुलढाणा तालुक्यातील दहीद येथील पांडुरंग तुकाराम देवकर यांचा समावेश आहे. विशेष व उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यातून एकमेव शौर्यचक्र पदक विजेते रमेश चंद्रभान बाहेकर आहे.  सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १०६८ सैनिक जीवंत असून ४९२ मृत पावले आहे.