तुळजापूरातील नळदुर्गमध्ये वीज पडून बैल ठार

259

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना परिसरातील सर्व्हे नंबर 239 मध्ये वीज पडून एक बैल ठार झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. रविवारी दुपारी वीजेच्या कडकडाटास व ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास वादळी वारे व वीजेच्या कडकडाटासह आवकाळी पाऊस सुरु झाला. या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वीजांचा कडकडाट सुरु होता. नळदुर्गच्या श्री तुळजाभवानी साखर कारखाना परिसरातील शंकर शिवराम कांबळे यांच्या सर्व्हे नंबर 239 मध्ये बांधलेल्या एका बैलावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग सज्जाचे तलाठी कदम यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.

आपली प्रतिक्रिया द्या