फक्त 25 रुपयांत राजभवनातील ‘बंकर’ दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजभवनातील हिरवळीखाली तब्बल 15 हजार चौरस फूट जागेत दडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरचे दर्शन सर्वसामान्यांना फक्त 25 रुपयांत होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या बंकरमध्ये वेगवगळय़ा आकाराचे 13 कक्ष असून त्याची डागडुजी करून एwतिहासिक बंकररूपी संग्रहालय साकारले आहे.

राजभवनात बांधकाम सुरू असताना 2016 मध्ये भूमिगत बंकर आढळले होते. सुमारे सहा दशकांहून अधिक काळ दुर्लक्षित असलेले हे बंकर सतत झिरपणाऱया पाण्यामुळे कमकुवत झाले होते. मात्र या बंकर्सची ब्रिटिशकालीन रचना आणि त्याचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे म्हणून त्याची डागडुजी करून येथे ऐतिहासिक आभासी वास्तवदर्शी संग्रहालय तयार केले आहे. तसेच संपूर्ण बंकरला किल्ल्याचा साज दिला आहे. ते लवकरच सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार असून त्याचे शुल्क केवळ 25 रुपये असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांना येथे तत्कालीन शेल स्टोअर, गन स्टोअर, सेंट्रल आर्टिलरी स्टोअर, वर्कशॉप पाहता येणार आहे.

राज्यपालांनाही मोह आवरला नाही
राष्ट्रपतींच्या हस्ते रविवारी राजभवन येथील बंकरचे लोकार्पण झाल्यानंतर आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बंकरची पाहणी केली. तसेच आज जागतिक छायाचित्र दिन असल्याने त्यांना बंकरसमोर ठेवलेल्या तोफा कॅमेऱयात टिपण्याचा मोह आवरला नाही.