खूशखबर! गणेशोत्सवासाठी शिवसेनेची बससेवा

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने माफक दरात एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 11 सप्टेंबरपासून ही सेवा बोरिवली ते गुहागर, बोरिवली ते चिपळूण आणि बोरिवली ते खेडदरम्यान संध्याकाळी 8 वाजता सोडण्यात येणार आहे. विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, मागाठाणे आमदार प्रकाश सुर्वे, युवा सेना मुंबई कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना विभाग संघटक अमित मोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी

जगदीश मोरे-9870376343, विनय बांदेकर-8286954995 यांच्याशी संपर्क करावा.