उद्योजक लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडनमध्ये निधन

प्रसिद्ध उद्योगपती आणि अनिवासी हिंदुस्थानी लॉर्ड स्वराज पॉल (94) यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. यशस्वी उद्योजक आणि परोपकारी अशी त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये त्यांची संपत्ती 2 अब्ज पौंडांची म्हणून नोंद करण्यात आली होती. ब्रिटनमधील ते 81 वे श्रीमंत व्यक्ती होते.

पॉल यांनी ब्रिटनमधील कपारो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची स्थापना केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पॉल यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले. उद्योग, परोपकार, ब्रिटनमधील सार्वजनिक सेवा आणि हिंदुस्थानाबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉल यांना श्रद्धांजली वाहिली.