
फुलपाखरं हा निसर्गाने निर्माण केलेला एक अद्भुत अविष्कारच! किती तरी आकाराची आणि रंगाची ही वेगळी दुनिया आपल्याला मंत्रमुग्ध करत आलेय. परंतु अत्यंत नाजुक असलेला हा जीव कॅमेऱ्यात पकड़ण तेवढच कठीण असतं. देवरुख येथील निसर्गप्रेमी तरुण प्रतिक मोरे याने आपल्या घराजवळ फुलपाखरांसाठी एक उद्यान तयार केले आहे. रंगीबेरंगी फुलपाखरांची छायाचित्रे टिपण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने हा खटाटोप केला आहे.
फुलपाखरे, पक्षी यांचे छायाचित्रण करायचे असेल तर त्याला दर्जेदार कॅमेरा असणं गरजेचे असते. घराजवळ किंवा परस बागेत कोकणी माणुस बागकाम करत नाही असं सहसा होत नाही. कोकणात फिरत असताना प्रत्येक घराजवळ नारळ, पोफळी, केळीची झाडं तर नक्की पाहायला मिळतात. पुढच्या दारात मोगरा अबोली जास्वंदी, गुलाब तर घराची शोभा वाढवत असतात. यातच आणखी काही विशीष्ट फुलझाडे लावली की तुमचं फुलपाखरु उद्यान तयार होइल असं प्रतिम मोरेने नमूद केलंय. त्याने स्वतःच्या घरासमोर केलेल्या उद्यानात दिवसभर विविध रंगांची , आकाराची फुलपाखरे फुलझाडांवर रुंजी घालत असतात.
फुलपाखरांच विश्व आणि त्यांची जीवनशैली पाहिली तर , त्यांना दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे झाड़ आणि दुसर म्हणजे उन्ह सावली. यासाठी प्रतिकने आपल्या बागेत काही जागा उन सावलीच्या तयार केल्या आहेत . उन्हात फुलपाखरे आपले अंग शेकवतात असं प्रतिकचे निरिक्षण आहे. साधारण पंखांच तापमान 30 ते 40 डिग्री पर्यंत पोहचलं की फुलपाखर कार्यान्वित होतात. म्हणूनच बागेत थोडं उन, थोड़ी सावली, थोड़ा दमटपणा आणि पाण्याची सोय एवढ्या गोष्टी असायला हव्या असं प्रतिकने सांगितले.
झाडांचा विचार केला तर , दोन प्रकारची झाड़ फुलपाखरना आवश्यक असतात एक म्हणजे नेक्टर प्लांट ज्यात त्यांना मधु रस मिळेल आणि दूसरी होस्ट प्लांट ज्यावर फुलपाखर अंडी घालु शकतील. अशी झाड़ लावण त्यांच् संगोपन करण कठीण नक्कीच नाही. फक्त खते कीटकनाशके आणि इतर केमिकल्स यांचा वापर मात्र टाळला पाहिजे हे आवर्जून लक्षात घ्यावे असेही प्रतिक मोरेने नमूद केलं. काही फ़ुलपाखर ही मधुरस सेवन न करता कुजलेली आणि खराब झालेली फळ किवा इतर पदार्थ यावर अवलंबून असतात यांच्या साठी खराब झालेली केळी, संत्री तुम्ही या उद्यानात ठेवू शकता. तसेच अनेक तण वर्गीय झाडं कुरडू काही प्रकारच्या वेली , करिंदे रानटी मुग ही झाडं फुलपाखरांसाठीच्या उद्यानात असायला पाहिजेत. या सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर तुमच फुलपाखरू उद्यान तयार होतं . मग आपला छंद जोपसता जोपसता पर्यावरण संरक्षणालाही आपला हातभार लागला याचा आनंद मिळतो तो वेगळाच. प्रतिकने तयार केलेल्या उद्यानात दररोज शेकडो फुलपाखरे येत असतात. विविध जातीच्या फुलपाखरांचा अभ्यास करत प्रतिकने आजवर फुलपाखरांची हजारो छायाचित्रे काढली आहेत. प्रतिकचे हे निसर्गप्रेम नक्कीच कौतूकास्पद मानले पाहिजे.
































































