बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि सहयोगी अपक्षांच्या आघाडीकडे 162 चे संख्याबळ आहे. आता हे संख्याबळ 170 च्याही पुढे जाणार असल्याचे या आघाडीचे नेते सांगत आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून आणखी पक्ष आघाडीसोबत आल्याचे जाहीर केले आहे.  बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे.

‘बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षीतिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांनी आज माझी भेट घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला’, असे चव्हाण यांनी या ट्वीट केले आहे.