
केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुपांतर झाले. पण नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशभरात संतापाचा डोंब उसळला आहे. ईशान्य हिंदुस्थानासह दिल्लीतही ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली होती. नागरिकत्व कायद्याला विरोध करणारं हे आंदोलनाचं लोण आता दक्षिणेकडेही सरकलं आहे.
Karnataka: Police has detained historian Ramachandra Guha during protest at Town Hall in Bengaluru. (file pic) #CitizenshipAct pic.twitter.com/iW7HkllXc3
— ANI (@ANI) December 19, 2019
बेंगळुरूमध्ये ही अनेक संघटना CAA विरोधात आंदोलने करत आहेत. त्यांच्यासह अनेक राजकीय पक्षही आंदोलनात उतरले आहेत. यावेळी या कायद्याला विरोध करणारे इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संपूर्ण बेंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पोलीस शहरातील ठिकठिकाणी जमून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचे काम करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
Karnataka: Left parties hold protest in Bengaluru against the amended #CitizenshipAct & #NRC. Visuals from Mysore Bank Circle area. Section 144 is imposed in the city. pic.twitter.com/f3LIjzqOHu
— ANI (@ANI) December 19, 2019
























































