
नागरिकत्व कायद्यावरून देशात गदारोळ सुरू असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कायद्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाकिस्तानातून कुणी मुस्लिम व्यक्ती हिंदुस्थानात आल्यास व येथे कायमस्वरूपी वास्तव्य करायचे असल्यास त्याला हिंदुस्थानी नागरिकत्व देण्याची तरतूद नागरिकत्व सुधारणा कायद्यात आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील जंगपुरा भागात निवडणूक प्रचारसभेत राजनाथ बोलत होते.



























































