ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी कारभाराचा निषेध; कॅब चालकांची पुणे ते मुंबई पदयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओला, उबेर, रॅपिडो या अॅप-आधारित पंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ कॅब चालकांनी पुण्याहून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. 10 एप्रिलला तीन कॅब चालकांनी पुण्यातून सुरू केलेली पदयात्रा मंगळवारी अंधेरी विमानतळ परिसरात पोहोचली. हे कॅब चालक बुधवारी दुपारी आझाद मैदानात पोहोचणार असून नंतर परिवहन अधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत. राज्यभरात ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या पंपन्या बेकायदेशीररीत्या व्यवसाय करीत असल्याने कॅब चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिवहन विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून अॅपवर मनमानी दर दाखवणे तसेच कोणताही वैध परवाना नसताना शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू आहे, याकडे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.