
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयानुसार अध्यक्षांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन, 500 रुपये प्रतिबैठक भत्ता, कार्यालयीन कामासाठी वाहन, सहाय्यक कमर्चारी वर्ग आदी सुविधा मिळणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राम्हण समाजाला खूश करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. 3 ऑक्टोबर 2024 रोजी महामंडळ स्थापन करण्यात आले होते.