
>>डॉ. ज्योती धर्माधिकारी
तिच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन तिला 2018 मध्ये सर्वोच्च असा ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला आहे. इराक देशामध्ये कट्टर धर्माभिमानी संघटनांनी केलेल्या अनन्वित छळाला बळी पडणाऱया हजारो नागरिकांपैकी स्वतः नादिया मुरादही आहेत. या संघटनेवर अंकुश ठेवून त्यांच्या मानवताविरोधी कृत्यांना लगाम घालण्याचे कार्य नादिया मुराद करत आहे.
नादिया मुराद या तरुण कार्यकर्तीने आपल्या कार्याने संपूर्ण जगाचे लक्ष इराकमधील नरसंहार, मानवी तस्करी, स्त्र्ायांचे लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांचे परिणाम याकडे वेधले आहे. ती इराकी सरकारसमोर सातत्याने जनतेचे, त्यातल्या त्यात अल्पसंख्य जनतेचे प्रश्न मांडते आणि या लोकांना निर्भयतेने जगता यावे आणि धर्मस्वातंत्र्य असावे या मागण्या करते. तिच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन तिला 2018 मध्ये सर्वोच्च असा ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला आहे.
राजकीय नेतृत्व हे सर्वात प्रभावी असते. कारण ज्यांच्या हातात सत्ता असते. ते सत्ताकेंद्रित राजकारण करून व्यक्ती, समाज आणि देश बदलण्यासाठी प्रभावी भूमिका करत असतात. राजकीय नेतृत्वावरदेखील प्रभाव करणाऱया काही स्त्र्ाया आहेत. एकूणच राजकारणावर वचक ठेवणारी, योग्य मार्गावर ठेवणारी एक व्यवस्था आहे. ही सामाजिक व्यवस्था चळवळीच्या माध्यमातून राजकारणावर अंकुश ठेवून असते. मानवाधिकार आणि लोकशाही हिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सामाजिक चळवळी या असायलाही हव्यात. म्हणूनच सामाजिक चळवळीचे नेतृत्व करणारे अधिक प्रभावी आणि दूरगामी परिणाम करणारी व्यवस्था निर्माण करणारे कार्यकर्ते असतात.
सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेल्या मानवाधिकार चळवळीची कार्यकर्ती नादिया मुराद बेसे ताहा या युवतीचं कार्यही याच पठडीत मोडणारं आहे. नादिया मुराद या 32 वर्षीय इराकी, येझिदी तरुणीने ‘नादिया इनिशिएटिव्ह’ या संघटनेची स्थापना केली. नरसंहार, सामाजिक अत्याचार आणि मानवी तस्करीच्या बळी पडलेल्यांना आधार देणे, लैंगिक शोषणाच्या बळी महिला व मुलांना मदत करणे, त्यांचे पुनर्वसन, पुनर्निर्माण करणे, हे या संघटनेचे मुख्य काम आहे. इराक देशामध्ये कट्टर धर्माभिमानी संघटनांनी केलेल्या अनन्वित छळाला बळी पडणाऱया हजारो नागरिकांपैकी स्वतः नादिया मुरादही आहेत. या संघटनेवर अंकुश ठेवून त्यांच्या मानवताविरोधी कृत्यांना लगाम घालण्याचे कार्य नादिया मुराद करत आहे. तिच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन तिला अनेक सन्मान मिळाले. 2018 मध्ये त्यांना डेनिस मुक्वे यांच्यासह भागीदारीमध्ये सर्वोच्च असा ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला. ‘युद्ध आणि सशस्त्र्ा संघर्ष यामध्ये लैंगिक शोषण, हिंसेचा शस्त्र्ााप्रमाणे उपयोग करणे थांबविण्याच्या तिच्या अथक प्रयत्नांसाठी’ तिला नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारी ती पहिली इराकी यझिदी महिला आहे.
इराकमधील कोचो या सिंजरी शहरातील गावात नादियाचा (10 मार्च 1993) जन्म झाला. तिचे कुटुंब अल्पसंख्य समाजापैकी एक होते. कोचोमध्ये यझिदी हा अल्पसंख्य समाज आहे. या गावात इसिस संघटनेचा अनन्वित अत्याचार सुरू होता. 2014 मध्ये गावावर या कट्टर धार्मिक संघटनेने हल्ला केला, यझिदी समाजाचे जवळ जवळ 600 लोक मारले गेले, त्यामध्ये नादियाची चार भावंडेही होती. या संघर्षामध्ये एकूण 6700 महिलांची आणि मुलींची धरपकड करण्यात आली. दुर्दैवाने या मुलींमध्ये नादियाचाही समावेश होता. लैंगिक गुलाम म्हणून या महिलांची तस्करी करण्यात येत असे. पकडलेल्या नादियाचीही अनेक वेळा लैंगिक शोषणासाठी खरेदी-विक्री झाली. नादिया त्यावेळी केवळ एकोणीस वर्षांची होती. त्या छोटय़ा वयात तिच्यावर अनन्वित अत्याचार झाले. मारहाण तर दररोजच होत असे. सिगारेटचे चटके, सामूहिक बलात्कार वारंवार झाले. अशा अमानुष प्रसंगांना तोंड देत नादिया कशीबशी तीन महिने त्या छळछावणीत राहिली.
एक दिवस प्रसंग बघून ती तिथून निसटली. शेजारच्याच एका मुस्लिम कुटुंबाने तिला आसरा दिला आणि जर्मन शरणागत छावणीपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी मदत केली. नोव्हेंबर 2014 मध्ये नादिया मुक्त झाली. पुढे जर्मनी हेच नादियाचे नवे घर ठरले. नादियाला तिच्यावर झालेल्या अमानुष छळाला वाचा फोडण्याची ऊर्मी गप्प बसू देत नव्हती. तिने ‘बासिमा’ या टोपण नावाने फेब्रुवारी 2015 मध्ये पहिल्यांदा एका बेल्जियम वर्तमानपत्राला मुलाखत दिली आणि इराकमध्ये कट्टरतावादी संघटनेने सुरू केलेल्या अनन्वित छळाला वाचा फोडण्याचे काम केले. इराकमधील अत्याचार म्हणजे एक प्रकारचे सुप्त युद्धच होते. या युद्धामध्ये मानवी तस्करी, लैंगिक शोषण यांचा वापर शस्त्र्ााप्रमाणे केला जात होता. अशा सर्व अमानुष गोष्टी त्वरित थांबाव्यात म्हणून नादिया मुरादने स्वतःची संघटना स्थापन केली. डिसेंबर 2015 मध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये इराकमधील नरसंहार आणि लैंगिक शोषणाबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून तिला जीवे मारण्याच्या धमक्या यायला सुरुवात झाली. या धमक्यांतूनच एका कणखर सामाजिक कार्यकर्तीचा जन्म झाला.
‘नादिया इनिशिएटिव्हची’ ती संस्थापक अध्यक्ष या नात्याने जगभरातील स्त्र्ायांवरील लैंगिक अत्याचार आणि मानवी तस्करीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक आणि स्थानिक चर्चेत सहभाग घेतला. 2016 मध्ये अमली पदार्थ, नरसंहार, सामाजिक अत्याचार आणि हिंसा पीडितांना सन्मानपूर्वक जगता येण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमली पदार्थ आणि संघर्षची ‘गुडविल अँबॅसेडर’ म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली.
2018 मध्ये खाण सल्लागार समितीसोबत काम करताना तिने सिंजर शहरातील 2.9 दशलक्ष एकर जमीन खाणमुक्त केली. त्याच वर्षी तिने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कट्टर इस्लामिक संघटनांविरुद्ध अध्यादेश तयार करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. 2020 मध्ये नादियाला ‘मुराद कोड’ स्थापन करण्यासाठी युनायटेड किंगडम सरकारने आमंत्रित केले, त्यामार्फत स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण संपवण्यासाठी मदत आणि पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाणार आहे. नादियाचे आत्मचरित्र ‘द लास्ट गर्लः माय स्टोरी ऑफ कॅप्टनिटी, और माय फाइट अगेन्स्ट द इस्लामिक स्टेट’ प्रसिद्ध आहे.
इराकी सरकारने येझिदीसह अल्पसंख्य जनतेला अभय आणि धर्मस्वातंत्र्य द्यावे याबद्दल ती आग्रही आहे आणि तेथील अध्यक्षांनीही तिच्या मागणीला मानवाधिकाराची मागणी असे म्हटले आहे. तिची रास्त मागणी मान्य करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.
या प्रभावी स्त्रीने एकूणच स्त्रियांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज जगभरातील नेतृत्वांना ऐकायला लावला, वेगवेगळ्या देशात त्यासंदर्भात कायदे तयार झाले. हे तिच्या चळवळीचे फार मोठे यश आहे.
– [email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)



























































