कॅनडात ‘हेट क्राइम’! हिंदुस्थानी विद्यार्थी, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

कॅनडात हेट क्राइम्स अर्थात द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि हिंदुस्थानविरोधी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे कॅनडात शिक्षण घेणारे हिंदुस्थानी विद्यार्थी, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या आहेत.

कॅनडात हिंदुस्थानी नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच दरवर्षी अनेक हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडात जातात. विशेषतः एमबीआय शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. मंगळवारी ऑन्टारियोमध्ये गोळीबारात सतिवदर सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. एम. के. ऑटो रिपेअर्स या दुकानात अर्धवेळ नोकरी करून तो शिक्षण घेत होता. या गोळीबारानंतर हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पॅनडात द्वेषपूर्ण गुन्हे सांप्रदायिक हिंसाचार वाढला आहे. हिंदुस्थानविरोधी कारवायामागे खलिस्तानी अतिरेकी असण्याची भीती आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?

 हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अॅडव्हायजरी जारी केली आहे. पॅनडात असणारे विद्यार्थी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी. जे लोक प्रवासासाठी पिंवा शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनीही सतर्कता बाळगावी.

 कॅनडातील हिंदुस्थानी विद्यार्थी आणि नागरिकांनी टोरंटो, वॅनक्युवरमधील वाणिज्य दुतावास आणि ओटावातील कार्यालयात नोंदणी करावी.

 हिंदुस्थानींवर वाढत्या गुन्हय़ांचा तपास करून कॅनडा सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करावी.