कॅनरा बँकेची एफडी व्याजदरात कपात

एसबीआयनंतर आता कॅनरा बँकेनेही मुदत ठेव म्हणजेच एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. नव्या व्याजदरांनुसार, सामान्य ठेवीदारांना आता 1 वर्षाच्या एफडीवर 6.95 टक्के व्याज मिळेल. 2 वर्षांच्या एफडीवर 6.90 टक्के व्याज मिळेल. 3 वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकणार आहे. 7 ते 45 दिवसांसाठी 4 टक्के, 91 ते 179 दिवसांसाठी 5.50 टक्के, 180 ते 269 दिवसांसाठी 6.15 टक्के आणि 270 ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.25 टक्के व्याज मिळणार आहे.