अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्दच करा, निर्णय कायम ठेवण्याबाबत एमफुक्टोचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

741
ias-exams-bta1
प्रातिनिधिक फोटो

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थीहिताचा असून उच्च व तंञशिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमपुâक्टो) ने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम आहे. या महामारीमुळे आरोग्याबरोबरच आर्थिक परिस्थितीसुद्धा गंभीर बनत चालली आहे. त्याचा परिणाम शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्याथ्र्यांवर होत आहे. महाविद्यालये व विद्यापीठे यांनाही त्यांच्या विद्याथ्र्यांच्या कुटुंबाच्या बुडालेल्या रोजगारांची, गमावलेल्या नोकऱ्यांची कल्पना नाही, असा आरोप एमपुक्टोने केला आहे.
अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत यूजीसीने मे महिन्यात केलेल्या शिफारशीनुसार शेवटच्या वर्षातील विद्याथ्र्यांच्या परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जातील. व त्याची घोषणा जूनमध्ये केली जाईल असे जाहीर केले होते. मात्र विद्यार्थीहित पाहून जूनमध्ये राज्य सरकारने शेवटच्या वर्षातील विद्याथ्र्यांच्या परीक्षा रद्द करून, त्यांना त्यांच्या मागील सरासरीने गुण देणे तसेच पुढील काळात होणाऱ्या परिक्षेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय विद्याथ्र्यांसोबतच शिक्षक व कर्मचारी यांच्याही हिताचा होता. मात्र आता युजीसीने सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थांच्या हितासाठी राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवून विद्यापीठांना कळवावे, असे पत्र एमफुक्टोचे महासचिव प्रा. डॉ. एस. पी. लवांदे व अध्यक्षा प्रा. डॉ. तपती मुखोपाध्याय यांनी दिले आहे.

दिल्लीत अंतिम परीक्षा रद्द
दिल्लीत कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे सेमिस्टर-४ आणि अंतिम परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज ही घोषणा केली. कोरोनाच्या प्रभावामुळे विद्याथ्र्यांच्या परीक्षांचे काय होणार असा सवाल विद्यापीठांकडून सरकारला विचारला जात होता. मात्र कोरोनाचा प्रभाव पाहता आधीच स्थिती खराब आहे. त्यामुळे अशा स्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याचेही सिसोदिया यांनी स्पष्ट केले. विद्याथ्र्यांना आतापर्यंतच्या सेमिस्टरच्या आधारित मूल्यमापन करून पदवी देण्याबाबतही सरकारला विद्यापीठांकडून विचारणा करण्यात येत असल्याचे सिसोदिया म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या